बीसीसीआयची आयपीएल ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आर्थिक उलाढालीमध्ये वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत असताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेमुळे चांगलाच तोटा सहन करावा लागतो आहे. पहिल्या दोन हंगामांमध्ये आर्थिक व्यवहारांमधली अनियमीतता, संघमालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी झालेला उशीर, पत्रकार-स्थानिक क्रिकेट बोर्डाचे सदस्य यांना देण्यात आलेले भत्ते यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला तब्बल २४ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.

Auditor General of Pakistan ने यासंदर्भातला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत हा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघमालक यांच्यांमध्ये योग्य संभाषण नसल्यामुळे झालेल्या तोट्याची आकडेवारी सादर केली आहे. याचसोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेसाठी देण्यात आलेला १४ कोटींचा निधी पाकिस्तानबाहेर अवैध रित्या ट्रान्स्फर केला आहे. याचसोबत सामन्यांचं प्रक्षेपण करण्यासाठीच्या हक्कांचा लिलाव न केल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला आहे.