बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसत असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याची तुलना काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजशी केली जात आहे. तसेच अभिषेकचा चित्रपटातील अभिनय पाहून त्याला देखील सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. पण अभिषेक देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.

एका यूजरने ‘द बिग बुल’ चित्रपटासंदर्भात ट्वीट करत अभिषेकला ट्रोल केले. ‘नेहमी प्रमाणे अभिषेक बच्चनने आपल्या थर्डक्साल अभिनयाने सर्वांना नाराज केलेले नाही. अतिशय घाणेरडी स्क्रिप्ट आणि चित्रपट. स्कॅम १९९२ खूप वेगळा होता’ या आशयाचे ट्वीट त्या यूजरने केले. त्यावर अभिषेकने देखील उत्तर देत ट्रोलरला सुनावले आहे.

आणखी वाचा : “राजकारण्यांच्या प्रचारसभा चालतात पण सामान्य व्यक्ती ऑफिसला नाही जाऊ शकत”

ट्रोलरचे आभार मानत अभिषेक म्हणाली की, ‘मी तुम्हाला निराश केले नाही हे ऐकून मला फार आनंद झाला. माझा चित्रपट पाहिल्याबद्दल तुमचे मानापासून आभार.’ अभिषेकनेही त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले.

अभिषेकने ट्रोलरला दिलेले उत्तर पाहून अनेकांनी त्याची प्रशंसा केली. पण ट्रोलर देखील शांत बसला नाही. त्याने अभिषेकच्या ट्वीटवर उत्तर दिले आहे. ‘अभिषेकचे दिलेले उत्तर लोकांना आवडले हे पाहून मला आश्चर्य वाटले. हा माणून एका प्रेक्षकाने केलेली टीक देखील सहन करु शकत नाही. अभिषेक वास्तविकतेचा स्वीकार कर’ असे तो ट्रोलर म्हणाला.

८ एप्रिल रोजी ‘द बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली होती. आता द बिग बुल प्रदर्शित होताच चित्रपटाची तुलना ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ या सीरिजशी केली जात आहे.