राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच अनेकांच्या प्रचारसभांनीही राज्यात जोर धरला आहे. शेजारी राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शाह आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील महाराष्ट्रात सभांसाठी हजेरी लावत आहेत. अशातच मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे.

रविवारी सकाळपासूनच ट्विटरवर #मोदी_परत_जा हा मराठी हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सोशल नेटवर्किंगवरून विरोध होत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. अनेकांनी या हॅशटॅगच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी राज्यातील प्रश्न उपस्थित करून ‘मोदी परत जा’ असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलण्यापेक्षा राज्यातील समस्यांवर बोलावं अशी मागणी या हॅशटॅगच्या माध्यमातून केली आहे. तर पाहुयात काही व्हायरल झालेले ट्विट.

Sharad pawar on Eknath khadse
‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता
ncp spokesperson anand paranjape marathi news, anand paranjape criticize mahavikas aghadi marathi news
“निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला”, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची टीका

मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी #GoBackModi हा हॅशटॅग मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधी ट्विटवर ट्रेंड होताना दिसून आला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी तामिळनाडूला गेले होते त्यावेळेसही त्यांना विरोध झाला होता. जानेवारी महिन्यामध्ये मोदी यांनी मदुराई येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हाही त्यांना विरोध झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ते चेन्नई येथे आयआयटीमध्ये पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळीही मोदींना विरोध करण्यात आला होता. केवळ भारतातच नाही तर चीनमधूनही मोदींच्या तामिळनाडू भेटीला विरोध होताना दिसला होता. चीनमध्येही हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. चीनमधील नेटकऱ्यांनी मोदी परत जा या अर्थाचा #回到莫迪 (Huí dào mò dí) हा हॅशटॅग वापरुन मोदींना विरोध करणारे ट्विट केले होते.