गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. अशात देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आले आहेत. तर लवकरच देशात संपूर्ण लॉकडाउन पुन्हा जाहीर करण्याचे संकते मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी दिले आहेत.
तर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेत महेश कोठारे यांनी लॉकडाउन हा पर्याय नाही असं विधान केलं आहे. मात्र महेश कोठारे यांना त्यांच्या या विधानामुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. महेश कोठारे यांनी 11 एप्रिलला एक ट्विट केलं होतं. यात “लॉकडाउन हे उत्तर नाही” असं ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना अनेकांनी ट्रोल केलंय.

काही युजर्सनी महेश कोठारे यांचा गेल्या वर्षीचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ज्यात ते थाळ्या वाजवत करोना योद्धांचा सन्मान करताना दिसतं आहेत. या फोटोवर युजरने म्हंटलं आहे, “यांना कोरोना झाला तर सर्व सोयी सुविधा मिळणार म्हणून बोलायला सूचतयं. थाळी वाजवा तेवढचं जमणार तुम्हाला.”

तर एक युजर म्हणाला, “माझी परिस्थिती पण हलाकीची आहे, रिक्षा आहे , कुठून हफ्ते फेडायचे, इलेक्ट्रॉनिक दुकान आहे, भाडं कसं भरायचं. कूलर, पंखे याच 2 महिन्यात विकले जातात, पण वडील positiv निघून खूप काही त्रास झाला, एवढे झपाट्याने वाढ , जिव वाचवणे हीच कमाई सध्या.” असं म्हणत या युजरने महेश कोठारेंच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.

“इतकी गचाळ का राहतेस?”, ट्रोल करणाऱ्या महिलेला हेमांगी कवी म्हणाली…

तर दुसऱ्या युजरने महेश कोठारे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. “मागच्या वर्षी झोपलेलात का तुम्ही?” मराठी प्रेक्षकांच्या मनात तुम्ही चांगलं स्थान निर्माण केलं असून ते अशा पोस्टने खराब नका करू असं तो म्हणाला आहे.

दरम्यान, महेश कोठारे यांनी वृत्त वाहिनीवरील लॉकडाउन हावा की नको या विषयावरील एक व्हिडीओ शेअर करत “माझ्यावर टीका करणाऱ्य़ांसाठी उत्तर” एवढीच प्रतिक्रिया दिली आहे.