प्रकाश पदुकोण यांच्यानंतर 36 वर्षांनी इतिहास रचत साई प्रणीतने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. प्रणीतने जॉनथन ख्रिस्टीचा 24-22, 21-24 अशा सेटमध्ये पराभव केला. तर पी. व्ही. सिंधूनेही ताइ यिंगला हरवत 12-21, 23-21, 21-9 अशा सेटमध्ये हरवत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रणीतने दमदार खेळी करत 24-22 आणि 21-14 अशा सेटमध्ये सामना जिंकत सेमी फायनलमधलं स्वतःचं स्थान निश्चित केलं. 51 मिनिटात प्रणीतने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं. याआधी 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी ही मजल मारली होती. त्यांच्यानंतर सेमीफायनलमध्ये जाणारा प्रणीत आहे. त्यामुळे त्याने ऐतिहासिक खेळी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पी. व्ही सिंधूने गेल्या वर्षी वर्ल्ड टूर फायनलमध्ये ताइ झू ला 3 गेम्सने मात दिली होती. याआधी या दोघींमध्ये एकूण 14 सामने झाले आहेत. ज्यापैकी 4 सिंधूने जिंकले आहेत तर 10 ताइ झूने जिंकले आहेत. ताइ झू विरोधात मी कसोशीने लढले. हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारल्याचा मला आनंद वाटतो आहे असं सिंधूने म्हटलं आहे. शनिवारी सेमी फायनल होणार आहे त्यावेळीही मी चांगला खेळ करेन असा मला विश्वास आहे असेही सिंधूने म्हटले आहे.