विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे बापूसाहेब पठारे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काल(दि.१४) सकाळी एका रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्या रॅलीला 12 तास होत नाही, तोवर बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादीतर्फे वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने नगरसेवक सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्याने पठारे नाराज असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल(दि.१४) सकाळी  एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी महापौर आणि प्रभारी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीस 12 तास होत नाही, तोवर पठारे हे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या समवेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश झाला.

Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Mohite-Patil, Madha, Mohite-Patil Madha,
माढ्यात मोहिते- पाटलांच्या प्रवेशाने राजकीय गणिते बदलली
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप

या पक्ष प्रवेशाबाबत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्याशी संवाद साधला असता, “मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीत सहभागी झालो. तेव्हा माझे कार्यकर्ते म्हणाले, आजवर पक्षाने तुमच्यावर अन्याय केला. तरीही तुम्ही रॅलीत सहभागी झाला आहात, आता आम्ही पक्षाचे काम करणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले. त्यावर मी मागील पाच वर्षांचा विचार केला. राष्ट्रवादीकडून प्रत्येक बैठकीला डावलले गेले. माझ्या उमेदवारीचा विचार केला गेला नाही. या सर्व बाजूंचा विचार करुन भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. आता यापुढे भाजपाचेच काम करणार” असे ते म्हणाले.