करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. यामध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे चित्रीकरण बंद आहे. परिणामी चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या पडद्यामागील कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हाऊसफुल’ या चित्रपटाचे निर्माता साजित नाडियाडवाला यांनी तब्बल ४०० कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठीही काही रक्कम देऊ केली आहे.

अवश्य पाहा – ‘माझं नाव चँग आहे करोना व्हायरस नाही’; चिनी समजून हिणवणाऱ्यांना अभिनेत्याने सुनावले

साजित यांनी एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली. ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ आणि ‘नाडियाडवाला ग्रँडसन फाउंडेशन’ या संस्थांतर्फे त्यांनी ही मदत जाहीर केली आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे आली अभिनेत्रीवर कपडे धुण्याची वेळ; कपडे तुडवून व्यक्त केला राग

साजित यांनी या पत्रकामध्ये कोणाला मदत करणार याची एक यादी दिली आहे.

१. पंतप्रधान सहाय्यता निधी

२. मुख्यमंत्री सहाय्यता निधी

३. मोशन पिक्चर्स अँड टिव्ही प्रोड्यूसर्स वेलफेयर ट्रस्ट

४. श्री भैरव सेवा समिति

५. फिल्म इंडस्ट्री वेलफेयर ट्रस्ट

६. ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ कंपनीतील ४०० कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस

अशा स्वरुपात साजित नाडियाडवाला यांनी मदत जाहीर केली आहे.