भाजपाकडून सध्या अनेक वक्तव्यं केली जात आहे. ही वक्तव्यं म्हणजे भाजपाची पराभूत मानसिकता दर्शवणारी आहेत. आपले आमदार बाहेर पडू नयेत त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून चाललेली धडपड आहे. यांच्याकडून निवडणुकीपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ सारखी वक्तव्यं करत होते. आताही ते पुन्हा येतील असं म्हणत राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

राज्याचे महसुल मंत्री आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यातील काँग्रेस भवन येथे आले होते. त्यावेळी  पत्रकारांशी संवाद साधला असता. त्यांनी अनेक याविषयावर भूमिका देखील मांडली.  यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही आजअखेर सर्व सामान्य नागरिक आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहे. त्यावर विरोधक भूमिका मांडत आहे. पण महाविकासआघाडीच ठरल्याप्रमाणे राज्यात काम सुरू आहे”

काही दिवस थांबा  : बाळासाहेब थोरात

निवडणुकी दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसमधले अनेक नेते भाजपात गेले आहेत. ते आता पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत का? असं विचारलं असता, बाळासाहेब थोरात म्हणाले की, “लोकसभा निवडणुकी दरम्यान एक हवा आली. त्यावर त्यांच्या काही जागा आल्या, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही लोक भाजपमध्ये गेले. ते लोक आता अवस्थ आहेत. त्यामध्ये कोणा एकाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही. त्या सर्वांना सांगितले की, काही दिवस थांबा”

AIMIM ही भाजपची बी टीम : बाळासाहेब थोरात

एमआयएम पक्षाचे वारीस पठाण यांनी केलेल्या विधान बाबत विचारले असता. बाळासाहेब थोरात म्हणाले की, एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. NRC, CAA आणि NPR यावर यश येत नाही. हे पाहून भाजप आणि एमआयएमची नवी चाल असल्याचे भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षावर निशाणा साधला.