देशपातळीवर करोनाच्या अभूतपूर्व संकटाचा एकत्र येऊन सामना करावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील भाजपचे नेतेच हरताळ फासत असून राज्य सरकारला मदत करण्याऐवजी जनतेत असंतोष निर्माण होईल अशा प्रकारे राजकारण के ले जात आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन सावंत यांनी के ली.

केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी २० लाख मेट्रीक टन धान्य दिलेले आहे असे अतिरंजीत चित्र  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने २६ मार्चला ५ किलो अतिरिक्त धान्य प्रती व्यक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याचे पत्र केंद्रातर्फे फूड कार्पोरेशनला ३० मार्चला आले आहे. अजूनही एफसीआयकडून हे धान्य राज्य सरकारला प्राप्त झालेले नाही, असे सावंत यांचे म्हणणे आहे.

भाजपचे प्रत्युत्तर

संकटकाळी भाजपने राजकारण न करण्याचा उपदेश सचिन सावंत यांनी देण्याचे काहीच कारण नाही, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते  के शव उपाध्ये यांनी दिले आहे. अशा संकटाच्या  काळात आम्हाला राजकारण तर दूर परंतु टीकासुद्धा करायची नाही. हे आम्ही वारंवार सांगत आहोत, म्हणून प्रत्येक बाब ही विनंतीच्या स्वरुपात मांडत आहोत असे स्पष्ट केले.