तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या सामन्याबद्दल केलेल्या एका ट्विटवरून इंग्लंडच्या महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंमध्ये जुंपली.

‘टीम इंडिया’च्या तडाखेबाज फलंदाजाचा क्रिकेटला ‘रामराम’

इंग्लंडच्या महिला संघाचा न्यूझीलंडच्या संघाशी गुरूवारी भारतीय वेळेनुसार रात्री सामना सुरू होणार होता. हा वन डे सामना सुरू होण्याआधीच भारत-इंग्लंड कसोटी सामना संपला. त्यामुळे इंग्लंडची महिला खेळाडू अलेक्झांड्रा हार्टली हिने यासंबंधी ट्विट केले. “महिलांचा सामना सुरू होण्याआधी पुरूषांचा कसोटी सामना संपवल्याबद्दल इंग्लंडच्या संघाचे आभार. आता महिला क्रिकेट सामन्याचा आनंद लुटा”, असं ट्विट तिने केलं.

“इंग्लंडने जे केलं तसं ‘टीम इंडिया’ने कधीच केलं नसतं…”

हे ट्वीट काही इंग्लिश क्रिकेटपटूंना रूचलं नाही. इंग्लंड क्रिकेटपटू रॉरी बर्न्स याने, “हे ट्वीट खूपच खेदजनक आहे. पुरूष खेळाडू नेहमीच महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य बजावतात”, अशा शेलक्या शब्दात तिच्या ट्विटला रिप्लाय दिला. तर, इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट याने, “असं ट्वीट करणं चुकीचं आहे. महिला संघाच्या पराभवानंतर कोणत्याही पुरूष क्रिकेटपटूने असं ट्वीट नक्कीच केलं नसतं”, असं ट्विट करत अलेक्झांड्राला सुनावलं.

 

दरम्यान, इंग्लंडला भारताविरूद्ध १० गडी राखून पराभूत व्हावे लागले. पण इंग्लंडचा महिला संघ न्यूझीलंडविरूद्ध ७ गडी राखून जिंकला.