मुंबईतून रायगडमधील कोलाड येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील तिघेजण कुंडलिका नदीत बुडाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाकडून बुडालेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून कोलाड पोलीस, राफ्टिंग टीम आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, रायगडमधील कोलाडजवळील बल्हे गावामध्ये रविवारी ही घटना घडली असून मुंबईहून येथे पर्यटनासाठी आलेल्या २८ जणांच्या एका ग्रुपमधील काही जण कुंडलिका नदीच्या पाण्यात उतरले. मात्र, त्यांना कदाचित पोहता येत नसल्याने ते नदीच्या पाण्यात बुडाले असावेत असे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती कळताच कोलाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले.

दरम्यान, बुडालेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे.