सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सावंतवाडी :  गुजरात येथून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सांगेली येथे गोशाळेत गीर गाई आणल्या जात असताना रत्नागिरी येथील  गोरक्षकांनी अडवणूक केल्याने गोंधळ उडाला या गडबडीत गायीचे एक वासरू देखील मृत पावले त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत .

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी बोलताना सांगितले की , गोरक्षक असल्याचे सांगून रत्नागिरी येथून पाठलाग करत सावंतवाडीत येऊन रत्नागिरीचा गोरक्षकांनी तक्रार केली त्यानुसार  प्राण्यांची निर्दयीपणे वागणूक केली म्हणून चालकाविरुद्ध  तर दुसरी  पाठलाग करणाऱ्या  विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे .

सांगेली येथील अभिजित कविटकर यांच्या  गोशाळेत गुजरात येथून गीर गाई आणल्या जात होत्या राजकोट येथील लखन गनू राठोड हा दि. ८ सप्टेंबर रोजी सतरा गायी वासरू घेऊन निघाला होता तो रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे आला आणि त्याचा पाठलाग गोरक्षकांनी केला रत्नागिरी येथील पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली परंतु  खात्री करून तेथील पोलिसांनी गोशाळेत जाणारया गायींना नेण्याची परवानगी दिली .

स्वतला गोरक्षक संबोधणारे रत्नागिरीतील काही जण त्या गायींना आणणारया गाडीचा पाठलाग करून सावंतवाडीपर्यंत पोहचले आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली .यादरम्यान गायीचे एक वासरू मृत झाले होते त्यामुळे पोलिसांनी गंभीर दखल घेऊन वाहनचालक लखन राठोड

(राजकोट) यांच्या विरोधात प्राण्यांची निर्दयीपणे वागल्याची  तक्रार दाखल केली तर रत्नागिरी  येथील गोरक्षकांनी ट्रक चालक लखन राठोड याच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली असे पोलिसांनी सांगितले .

याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रत्नागिरी येथील संध्या अनिल कोसुंबकर यांनी लखन  गणू राठोड रा.राजकोट याच्या विरोधात गुन्हा दाखल केला  वाहनातून गुरे कोंबून आणली त्यामुळे वासराचा मृत्यू झाला आहे.  असे त्यांनी म्हटले आहे .

या गायींची वाहतूक करणारा चालक लखन गणू राठोड रा. राजकोट यांनी रत्नागिरी येथील संध्या कोसुंबकर, रुपेश यादव, हर्षल कोसुंबकर, अनिकेत वारेकर यांच्याविरोधात तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली . आपण सांगली येथील गोशाळेत गायी आणत असताना आपणात रत्नागिरी येथे अडवले तसेच आमचा पाठलाग करून वाहनातील जनावरांना चारा पाणी देण्यात अडथळा केला यादरम्यान गायीचा पाय वासरावर पडून वासरू मृत्यू झाले. त्याला हे चौघे जबाबदार आहेत असे लखन राठोड याने म्हटले आहे . गोपालचे जिल्हाध्यक्ष एकनाथ गावडे म्हणाले ,गुजरातवरून सांगेली पर्यंत गायींना  आणताना खाली उतरून पाणी व चारा देण्यासाठी सतत चालक प्रयत्न करत होता .परंतु रत्नागिरीतून पाटलाग करणाऱ्यांच्या भीतीने त्यांने मध्ये वाहनातून गाईना उतरवले नाही त्यामुळे चारा पण देता आला नाही तथाकथित गोरक्षकांनी चुकीची बाब केली आहे असे श्री गावडे यांनी म्हटले आहे .आपण याबद्दल स्वतंत्र तक्रार देणार आहोत तसेच आज पोलीस व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे . सांगेली येथील अभिजित कविटकर यांच्या गोशाळांमध्ये या गायी आणल्या जात होत्या याची पोलिसांनी खात्री केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.कविटकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून याबाबत खातरजमा केली आहे असे ते म्हणाले .