सध्या काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगचा फोटोही सध्या व्हायरल होत आहे. या उपक्रमावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. एवढ्या पैशात ५० छत्र्या आल्या असत्या म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

कांदिवली पूर्व मतदारसंघातले भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंगच्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या.”
पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच उपक्रमामुळे भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
solapur lok sabha, bjp candidate ram satpute
सोलापुरात गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत भाजप व काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने; तुंबळ घोषणा युद्ध
what Saina Nehwal Said?
“मग मी काय करायला हवं होतं?”, बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा ‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेसला थेट प्रश्न
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने या उपक्रमाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आलं होतं. यासंदर्भात शहरात काही ठिकाणी याचे पोस्टर देखील लागले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

आणखी वाचा- PHOTOS : पुणेकरांसाठी काँग्रेसचा मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम

पहिल्याच दिवशी पुणेकरांनी काँग्रेस भवनात आपल्या बिघडलेल्या छत्र्या घेऊन दुरुस्तीसाठी मोठी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. १७ जून ते १९ जून पर्यंत सकाळी ११ ते ६ या वेळात काँग्रेस भवनात नागरिकांना आपल्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं.