अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्टय़ा अस्थिर पदार्थाभोवती अन्य कोणत्याही गोष्टींचा संपर्क टाळण्यासाठी अरगॉन वायूचे आच्छादन घालण्याची म्हणजेच निष्क्रिय वातावरण तयार करण्याची पद्धत वापरली जाते. महत्त्वाची कागदपत्रे, ऐतिहासिक वस्तूंवर वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून ती अरगॉनच्या वातावरणात ठेवतात. खरंतर पूर्वी यासाठी हेलिअमचा वापर केला जात असे, पण ज्या वस्तूमध्ये हे वातावरण तयार केले असेल त्यामधून हेलिअम हळूहळू निसटत असे आणि त्यात पुन्हा हेलिअम भरायला लागत असे. हेलिअमप्रमाणे अरगॉन मात्र पटकन निसटत नाही.

अरगॉन कमी दाबाखाली हलका लालसर आणि उच्च दाबाखाली गडद निळा प्रकाश देतो. जाहिरातीसाठी वापरण्यात येण्याऱ्या हिरव्या, निळ्या रंगछटांचा प्रकाश देणाऱ्या नळ्यांमध्ये निऑनबरोबर अरगॉन भरलेला असतो. आधुनिक फ्लुओरेसंट दिव्यात अरगॉन-क्रिप्टॉन किंवा अरगॉन-निऑन यांचे मिश्रण वापरतात. निष्किय वायूंच्या मिश्रणामुळे दिवा चटकन सुरू होण्यास व तो चालू असताना विद्युतप्रवाह वाहून नेण्यास मदत होते. नेहमीच्या वापरातील दिव्यांमधील टंगस्टन धातूची तार अतिशय पातळ असते. ती तापल्यानंतर तिचे ऑक्सिडीभवन होऊ नये, वितळू नये किंवा बाष्पीभवन होऊ नये यासाठी बल्बमध्ये अरगॉन भरतात; असे दिवे अधिक काळ टिकतात.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

किरणोत्सारी कणांची संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘गायगर -म्यूलर’ गणकयंत्रात अरगॉनचा वापर करतात. ३९अ१ या समस्थानिकाचा अर्धआयुष्यकाल २६९ वर्षे असतो. भूजल आणि हीम गाभा यांचे कालनिर्धारण करण्यासाठी ते समस्थानिक वापरतात. तसेच स्तरीय-खडक, रूपांतरित-खडक, अग्निजन्य-खडक इत्यादींचे कालनिर्धारण करण्यासाठी अरगॉन वायूचा उपयोग करतात.

निष्क्रिय आणि कमी उष्णता वाहकता या गुणधर्मामुळे अरगॉन स्कुबाडायिवग करणाऱ्यांसाठी असलेल्या खास कपडय़ांमध्ये वापरला जातो. याशिवाय आणखी एका उद्योगात अरगॉन वापरला जातो तो म्हणजे कुक्कुटपालन. या उद्योगात एखाद्या रोगामुळे मोठय़ा प्रमाणावर पक्षी (कोंबडय़ा) रोगग्रस्त झाल्यास त्यांचा श्वास कोंडून त्यांना मारतात. त्यासाठीही अरगॉन वायू वापरतात.

अरगॉन बिनविषारी असला तरी हवेपेक्षा दाट असतो आणि बंदिस्त जागी हा वायू पसरल्यास कोंडल्यामुळे मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे अरगॉन वायूचा वापर, साठवण आणि हाताळणी जपून करावी लागते.

विजय ज्ञा. लाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org