विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १८ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र “विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भाजपा-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. तथापि सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत भाजपा सत्ता स्थापन करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर राज्यामध्ये दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने हलचाली सुरु केल्या आहेत. यामुळेच राज्यात आता ‘महाशिवआघाडी’ची म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांना आठवले आहेत ते काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले नारायण राणे आणि त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्याबद्दल केलेले ते वक्तव्य.

राज्यामध्ये ‘महाशिवआघाडी’ची सत्ता आल्यास भाजपाला विरोधीपक्षात बसावे लागणार आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी आता महाभरतीमध्ये आपले आपले पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या नेत्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक अशा अनेक नेत्यांच्या नावाने वेगवेगळे ट्विटस केले आहेत. मात्र सर्वात जास्त चर्चा आहे ती नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची. अनेकांनी राणे कुटुंबाला पुन्हा विरोधीपक्षात बसावे लागणार असण्यावरुन ट्रोल केले आहे. अनेकांना उद्धव ठाकरेंनी १६ ऑक्टोबरच्या कणकवलीच्या सभेत केलेली टीकाही अनेकांना आठवली असून त्यांची भविष्यवाणी खरं ठरल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे</p>

‘नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल माझ्याकडून भाजपला शुभेच्छा’, असा टोलाच उद्धव यांनी कणकवलीच्या सभेत लगावला होता. ‘मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत बसणे शक्य नाही. मी येथे टीका करण्यासाठी आलो नाही तर भाजपला सावध करण्यासाठी आलो आहे,’ असंही उद्धव यावेळी म्हणाले होते. दहा रुपयांत जेवण देणार ते मातोश्रीत शिजवणार का, असा सवाल नारायण राणेंनी आपल्या भाषणामध्ये आधी केला होता. त्याचाही समाचार उद्धव यांनी आपल्या भाषणातून घेतला होता. राणेंवर या टीकेवरुन पलटवार करताना उद्धव यांनी राणेंचा एकेरी उल्लेख केला होता. ‘जो मातोश्रीच्या मिठाला जागला नाही तो मला काय शिकवणार? भाजप आणि शिवसेनेत मिठाचा खडा टाकण्याचे उद्योग करू नको’, असा सल्ला उद्धव यांनी राणे यांना दिला आहे.

याच टीकेवरुन अनेकांनी राणेंना ट्रोल केले आहे.

उद्धव ठाकरे योग्यच म्हणाले होते

भाजपला पण विरोधी पक्षात बसवले

हॅलो…

Thank you

ईडीने घालवले अच्छे दिन

खांद्याला खांदा लावून काम

साडेसाती…

पप्पा आता काय करायचे

या वेळी सुद्धा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ नये

दोन मिनिटे शांतता

पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता..

विकासासाठी गेलो…

काँग्रेसमध्ये गेले… सत्ता गेली…

ताळमेळ जर नसेल तर…

कुठून अवदसा आठवली अन्…

त्याच वाटोळं होतं

दरम्यान, राज्यातील घडामोडींना वेग आला असून दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बैठक घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहे.